संदेश

प्रियास्मरणम्

चित्र
  अये दारिके मत्प्रिये चारुगात्रे त्वया स्नेहपाशैर्निबद्धो प्रियोsहम्। स्मरामि च त्वामादिनं कुञ्जनेत्रे त्वयि मे स्थितं मानसं प्रेमपूर्णम्॥

रेशीमगाठी

माझे मन तुमचे झाले कुणास ठाऊक कधी कसे तुमच्या प्रेमात पडले,  आयुष्याच्या वाटेवरती तुमचे माझे ऋणानुबंध जुडले गेले,  नात्याच्या या गोड बंधात तुमचा सहवास हवासा वाटतो पुन्हा पुन्हा तुमच्या प्रेमात पडावास वाटतं,    तुमची प्रेमळ साथ  हवीसी वाटते,  गेलेले सुंदर क्षण तुमच्या सोबत पुन्हा जगावेसे वाटते, गोड आठवणीना जपावस वाटतं माझ्या केसात प्रेमाने फुल लावणारे,  माझे हट्ट पुरवणारे 'आमचे अहो' ,  माझी प्रेमाने समजुत घालणारे,  माझी काळजी घेणारे,  सुख दुःखात सोबत असणारे 'आमचे अहो'  कधी मित्र होऊन गप्पा मारणारे,  कधी गुरु होऊन शिकवणारे, कधी पती होऊन सांभाळणारे 'आमचे अहो'  मला भरपुुर प्रेम देणारे 'आमचे अहो' प्रत्येक क्षणाला तुमची साथ हवीसी आहे,

वाढदिवसाच्या शुभेच्छा

चित्र
मनाचा कोपरा तुमच्यासाठी ठेवला, हृदयात माझ्या जपून ठेवला.   क्षणाक्षणाच्या आठवणीत मी तुम्हालाच पाहिलं, मला हसवतानाच पाहिलं.   तुमच्या आठवणीत मन माझं भिरकतच राहिलं, काय करू तुम्हाला कधी सोडून नाही राहिलं.   नातं आपलं असं जुळून राहिलं, या दिवसाला जपून पाहिलं. नात्याच्या गंधातून लहान फूल उमलून राहिलं, पण या दिवशी तुम्हाला पाहायचं राहिलं.   * माझ्या कडून व आपल्या परीकडून कवितेच्या स्वरूपात वाढदिवसाची छोटीशी भेट. *   २१ मार्च २०२२

श्री गणेशाय नमः

वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

मनी वाटते आज

चित्र
  💞 *प्रियाविरह* 💞 मनी वाटते आज मीलन व्हावे। प्रियेलागी स्वच्छन्द चुम्बीत जावे॥१॥ 🌹🌹🌹 धुरा ही धरे जी प्रपंचाची माझ्या। सदा तोषवी सर्व लोकांस वाचा॥२॥ 🌺🌺🌺 कळी जी असे रम्य जी कोमलांगी।  मनी ती स्मरे नित्य मजला शुभांगी॥३॥ 🌷🌷🌷 रमी मी जिच्या नित्य स्नेहार्द्र छंदी।  वसे ती सदा माझिया हृत्कपाटी॥४॥ 🌻🌻🌻 परी ती प्रिया तिष्ठते दूर देशी।  नि आता तिला सांग पाहू मी कैशी॥५॥ 🌸🌸🌸 ल्याली जरी ती न किंचित काही। तरी ना कमी काम्य किंचित होई॥६॥ 💐💐💐 लता ती असे *पल्लवी* पुष्पयुक्ता। फुलांच्या सुगंधे तोषवी कामश्रेष्ठा॥८॥ 🥀🥀🥀 वीणा निनादे तेधवा रम्य कर्णी। राहो *मधुकराची* तियेशीच प्रीती॥९॥ ❤️❤️❤️

आषाढमासे तिथौ च षष्ठ्याम्

चित्र
प्रियपत्नि पल्लवि! 🌿🌺शुभं जन्मदिनं ते। 🌿 🌺 🍀🌹🍀 🍰🍰🍰 आषाढमासे तिथौ च षष्ठ्यां या पल्लवी प्राप्तवतीह जन्म। याभूदीदानीं सहचारिणी मे तस्यै शुभायै शुभकामना मे॥ 🌷🌱🌷🌱🌷 🥧🥧🥧 🥮🥮🥮 आषाढ शुद्ध ६ शके १९२० 

मेहंदी हातावरी जिच्या

चित्र
  मेहंदी हातावरी जिच्या तियेला  कंठी कधी मी धरू वारू करुनि मी मनाचा जवळी कसा पोहचू। 🌺🌺🌺 रम्य ती आनंददा प्रियसखी  चित्री सुरम्या दिसे मनी तळमळी सदा मी  नेत्री प्रिया न दिसे॥ 🌹🌹🌹